आरोग्य रक्षणात योगदान   

नर्सिंग विभाग 

नर्सिंग हे समाजातील अत्यंत गरजेचे संवेदनशील आरोग्य सेवेतील व्यावसायिक रूप आहे. करूणा आणि समर्पणासाठी काळाच्या ओघात प्रतिष्ठित असलेल्या या व्यवसायाच्या पलीकडे एक अत्यंत विशेष व्यवसाय आहे, जो समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत विकसित होत आहे. सर्वात अचूक निदान सुनिश्‍चित करण्यापासून ते गंभीर आरोग्य समस्यांबद्दल जनतेला सतत शिक्षण देण्यापर्यंत सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी परिचारिका अपरिहार्य आहेत.सध्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय परिचारिका परिषदनुसार कौशल्य प्राप्त नर्सेसची गरज आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये गुणवत्ता, पारंपरिक आणि आधुनिक शिक्षण पद्धती यांचा समन्वय साधून राष्ट्रीय शिक्षण देणे, तसेच जनतेला सक्षम बनवून दर्जेदार उच्च शिक्षणाचे लोकशाहीकरण करणे या संकल्पनेतून ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ‘, पुणे अंतर्गत ‘गौरीताई टिळक कॉलेज ऑफ नर्सिंग‘ सोलापूर येथे सन २०१९ मध्ये सुरू करण्यात आले. सोलापूर शहरात बी.एस्सी. नर्सिंग पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे प्रथम महाविद्यालय हा मान प्राप्त झालेले आहे. सदर बी.एस्सी. नर्सिंग ८ सेमिस्टरचे (४ वर्षे) अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविले जाते.
 
महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. संदेश अशोक वमने यांना अ‍ॅकॅडमीक रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘बेस्ट प्रिंसिपल‘ अ‍ॅवार्ड देऊन गौरविण्यात आले.कुमार. आशितोष सगर या अंतिम वर्षातील विद्यार्थ्याने अश्‍विनी हॉस्पिटलच्या हृदय उपचार कक्षामध्ये वेंट्रिक्युलर टाकीकार्डिया (वेंट्रिकल्स उच्च हृदय गती) असलेल्या एका रूग्णाचा जीव वाचवून त्या रूग्णाला जीवदान दिले. त्याची ही उच्च कामगिरी ओळखून अश्‍विनी हॉस्पिटलकडून सन्मान करण्यात आला.महाविद्यालय आणि महिला रूग्णालय सोलापूर यांच्या सहभागातून आरोग्य शिबीर, जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध जनजागृती कार्य कार्यक्रमांचे आयोजन केले.‘कौशल्य भारत‘ कार्यक्रमाअंतर्गत होंडा कंपनीद्वारे महाविद्यालयामध्ये ४२ दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि ज्ञान वाढवणे आहे. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून, उत्कृष्ट कौशल्य प्रदर्शित केले.

Related Articles